जोहार

आर्वीला दौऱ्यावर जायचा ऑफिसमध्ये आदेश मिळाला. तत्क्षणी माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले गाडेगुरुजी अन् पार्वतीकाकू. उंचापुरा, कमावलेला आडवा देह, सावळा रंग, खादीचा नेहरू शर्ट, पायजामा, तपकिरी रंगाचे जाकिट, डोक्यावर गांधी टोपी अन् दाढीचे खुंट वाढलेला, मिशा ठेवलेला उग्र चेहरा. असे गुरुजी ! विरोधात किडकिडीत शरीराच्या मुळच्या गोऱ्यापान पण माझ्या स्मरणात थोड्याफार काळवंडलेल्या वर्णाच्या, नऊवारी लुगडं नेसलेल्या, चेपलेल्या गालांच्या, डोळ्याखाली काळी वर्तुळं अन् कपाळावर पैशाएवढं ढळढळीत कुंकू लावलेल्या वत्सल नजरेच्या पार्वतीकाकू.
Read More

मैत्रेयी

आज मी तुम्हाला जी कथा ऐकवणार आहे ती एका विदुषीची. माझ्या आयुष्यात डोकावलेल्या एका सुंदर नि बुद्धिमान खीची. सुंदर आणि बुद्धिवान तरुणी म्हणजे विधात्याच्या हातून घडलेला अपघातच, नाही का ?

हो... पण तसा घडलाय खरा. म्हणजे मी प्रत्यक्ष पाहिलाय ना तो. अनुभवलाय.

तेव्हा नमनालाच घडाभर तेल असं न करता सुरुवातच करतो ना कथेला -
तर तिचं नाव मैत्रेयी मैत्रेयी शारंगपाणी. चटकन डोळ्यात भरावे, अथांग डोहात बघत आहोत असं वाटायला लावणारे तिचे टपोरे काळेभोर डोळे, सरळ चाफेकळी नासिका, फडक्यांच्या कादबंतरीतील नायिकेप्रमाणे धनुष्याकृती भुवया, भव्य भालप्रदेश, केतकी वर्ण. वर्णन अजून कुठपर्यंत करीत राहू ? अजिंठ्यातील अप्सरा नजरेसमोर आणा म्हणजे झालं किंवा तुमच्या कल्पनेतील एखादी स्वरूप सुंदर तरुणी.

Read More

आरोप

"आजकाल तू माझ्यावर पूर्वीसारखा प्रेम करीत नाहीस." घरानं माझ्यावर आरोप ठेवला. माझ्याच घरानं ! त्या तीन मजली अवाढव्य वास्तूनं । अन् आरोपीसारखं माझ्याकडे ते डोळे वटारून पाहू लागलं.

अशाच एका उदास संध्याकाळी मी अंगणात आरामखुर्ची टाकून बसलो होतो. सूर्य क्षितिजाआड दडून बसला आहे, भोवतालची सृष्टी आपल्यातच डोकावून स्तब्ध झालेली आहे, वातावरणात राखाडी अंधार भरला आहे. आणि त्या अंधाराची कांबळी अंगभर गुंडाळून गुडूप बसलेल्या सभोवतालच्या इमारती, कोर्टात खटला ऐकावयास आलेल्या त्याशी संबंधित नसलेल्या इतर वकिलांसारख्या उत्सुक स्तब्धतेत बसल्या आहेत ही वेळ साधून माझ्या घराने माझ्यावर आरोप ठेवला. Read More

निवृत्ती

राम शिकेला हायकोर्टाने निर्दोष ठरवले. त्याला नोकरीवर परत घेण्याचा अन पूर्ण नुकसान भरपाई देण्याचा सरकारवर आदेश काढला.....
सान्यायमूर्तींनी दिलेला हा निकाल ऐकताना रामच्या कानात प्राण गोव्या झाले होते. जो निकाल मिळविण्यासाठी त्याने गेली पाच वर्षे जिवाचे रान केले हात, मानसिक कुतरओढ सोसली होती, आर्थिक आणि शारीरिक झीज सोसल होती तो मिळाल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ताण नाहीसा होताच स्प्रिंग जशी जरा वेळ थरथरत राहते तसे त्याचे शरीर क्षणभर कंप नजरेने त्याने न्यायमूर्तीकडे पाहिले अन् तो कोर्टाबाहेर पडला. पावले. कृतत

Read More

हट्ट


धरण फुटून कोंडलेलं पाणी जसं धो धो आवाज करीत वेगाने वाहू लागावं तसा पाऊस बाहेर एकदम कोसळू लागतो. अन् माझं लिहिण्यातलं चित्त उडतं.
• तसं लिहिण्यात फारसं मन नसतंच. थोडी फार सुरुवात करणं, पान दोन पानं काहीतरी खरडणं, नंतर नापसंतीनं त्याचे बोळे करून फेकणं असं केव्हापासून चाललेलं असतं. सुचलेली कथाच मुळी मनाला पटलेली नसते, अवास्तव वाटते.

पण तिचा नादही सुटत नाही. कारण कुठेतरी मनाला ती स्पर्शन गेलेली असते. कथेच्या नायिकेबद्दल कुठंतरी कोपऱ्यात सहानुभाव उत्पन्न झालेला असतो. तिची व्यथा वाचकांसमोर मांडून तिला न्याय द्यावासा वाटतो.... पण मन तयार नसतं. त्याला 'ती' वेडी वाटते, मूर्ख वाटते.

बोटांना चिकटलेलं कोळ्याचं जाळं सोडवायला जाताना ते बोटांना अधिकाधिक चिकटत जावं तसं ह्या कथेनं मांडलं होतं. त्यामुळे मनःताप अधिक वाढत होता, वैताग येत होता, मस्तक तापत होतं.... कागदाचे बोळे करणं बाढत होतं.

Read More

मनू सप्तर्षी


ऑफिस सुटल्यावर बसनं घरी परत जाताना मनू सप्तर्षीच्या मनात वारंवार अरविंदचा एकच प्रश्न उपस्थित होत होता

'आता कशाची आडकाठी आहे मनू !'

प्रश्न विचारताना त्याच्या डोळ्यात गोळा झालेली आर्जवी अपेक्षा मनूला व्याकूळ करून गेली.

'किती प्रतीक्षा करायची अरविंदनं ? अन् का? त्याचं आपल्यावर निस्सिम प्रेम आहे म्हणून केवळ ?.... असं आहे काय आपल्यात ? सौंदर्य ? बुद्धिमत्ता ? सुडौल शरीर ? जवळच हातानं धरून ठेवलेल्या कुबड्यांकडे मनूनं पाहिलं. वेडा !

जवळच हातानं धरून ठेवलेल्या कुबड्यांकडे मनूनं पाहिलं. वेडा !

Read More

उंची


त्या बिल्डींगचा पत्ता काढत काढत मी शेवटी तिच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. तिची उंची पाहून मला भोवळ आल्यासारखं वाटलं क्षणभर ! बापरे ! वीस महाते ! मनावर भार पडला. वीस मजल्याखाली ते दबलं.... पाय ओढत, एका हातातली पिशवी दुसऱ्या हातात घेत मौ तळमजल्यावर निघालो. पण....
तिथे तळमजलाच नव्हता !

Read More

नष्ट पुच्छ


"काही गरज आहे का ?"

"उपयोग होईल का ?"

"करायचीच काय इतकी किंमती वस्तू ?

"टिकाऊ असेल ?" उपाध्येबुवांना या प्रश्नांनी छळणं अजूनही सोडलं नव्हतं.

उद्या त्यांची एकसष्टी साजरी करण्याचं ठरलं होतं. मुलानं समारंभ मोठ्या थाटात करायचा घाट घातला होता. त्याप्रसंगी त्यांच्या डॉक्टर मुलानं त्यांना एक उत्तम मुलायम धोतरजोडी अन् शाल घ्यायचं ठरवलं होतं आणि ती त्यांनी आपल्या पसंतीची घ्यावी म्हणून स्वतःच्या कारमधून त्यांना या मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये आणून सोडलं होतं. कारमधून उतरवताना त्यानं त्यांना वारंवार बजावलं होतं.

Read More

श्रीमती श्रीखंडे बाईची कथा


'श्रीखंडेबाई आज सकाळी त्यांच्या बिछान्यावर मृतावस्थेत आढळल्या' असा फोन येताच कशालाही हात न लावण्याची सूचना देऊन इन्स्पेक्टर महेशांनी फोन बंद केला अन् मिळालेल्या पत्त्यावर ते सहकाऱ्यांना घेऊन ताबडतोब पोहोचले.... बाई अंथरुणावर झोपल्यासारख्या दिसत होत्या. झटापटीचं वा धडपडीचं काहीएक चिन्ह दिसत नव्हतं. चेहरा शांत होता !
खोलीतील सामान आपापल्या जागी व्यवस्थित होतं. तिच्या तपासणीत इन्स्पेक्टर महेशांना विशेष काही सापडलं नाही. बाईंची चालू वर्षाची डायरी नि झोपेच्या गोळ्यांची बाटली सोडून !

Read More

भविष्य


'कुणाकुणाचा ग्रहयोगच असा असतो, राजाभाऊ की, त्यांच्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सरळ नि वेळेवर होत नाही !' स्वतःच्या बाबतीत बोलताना, समोरच्या दातांवरून जीभ फिरवित निळू गाडगीळ गंभीरपणे नेहमी म्हणायचा.... अन् ते खरंही होतं !

निळूच्या आजवरच्या जीवनात कधी एक गोष्ट वेळेवर नि सहजासहजी झाली नव्हती. प्रत्येक वेळी कोणता ना कोणता ग्रह त्याला आडवा यायचा. जन्माला येण्याचीच गोष्ट घेतली तरी तेथेहि तोच प्रकार !

दामोदरपंतांनी स्वतःची नि आपल्या कुटुंबाची पत्रिका पाहून आणि गणित करून भविष्य वर्तवलं होतं की, 'लग्नानंतर बारा वर्षांनी स्वतःला अपत्यप्राप्ती, बाळंतपण अवघड, त्यानंतर पुन्हा पुत्रयोग नाही.'

Read More

-->

फुलवा


मी फुलवाचा खून केलाय ! दचकलात ? तुम्हाला माहीत आहे तिनं आत्महत्या केलीय म्हणून ? जंगलात एका झाडाला टांगलेल्या अवस्थेत तिचं प्रेत मिळालंय !
नव्या कोऱ्या हिरव्या साडीचा गळफास लावून तिनं आत्महत्या केलीय हे कोर्टात सिद्ध झालंय. आत्महत्येचं कारण क्षयी नवरा अन् आत्यंतिक दारिद्र्य कोर्टात सिद्ध झालंय ! भोळे आहात ! न्यायालयात न्यायच मिळतो असं समजता आहात म्हणून म्हणतो. जो न्यायालयात मिळतो, त्याला न्याय म्हणतात. म्हणावा लागतो. दुसरा पर्याय नाही म्हणून पण पैशानं न्याय विकत घेता येतो हे माहीत आहे तुम्हाला ?

Read More

स्त्रियश्चरित्रम् !


शांतानं मला असं अचानक का सोडून जावं ? आगाऊ कल्पना न देता ? कारण न सांगता ? माझ्या माघारी ?

त्या दिवशी सकाळी मी भाजी घेऊन घरी आलो आणि सोफासेट्सचे कव्हर्स नवीन खरेदी करायचे होते म्हणून पुन्हा बाहेर पडलो तेव्हा ती घरातच होती. मला चांगला टिकाऊ कपडा हवा होता आणि तोसुद्धा बैठकीच्या रंगाला मॅचिंग होणारा. म्हणून चार दोन दुकानं हिंडण्यात जरा जास्त वेळ गेला. घरी येऊन बैठकीत गेलो. कपडा मॅच होतो आहे हे पाहिलं अन् समाधानानं हुश्श करीत कोचावर बसलो. तर टिपॉयवर शांताची चिठ्ठी :

मी निघून जात आहे. कायमची. शोध घेण्याचा प्रयत्न करू नये.

Read More

ताण !


आज नेहमीप्रमाणे तो सकाळची न्याहरी करून अन् हातात अवजारांची शैली घेऊन कामाला बाहेर पडला. चार पाच घरची कामं आली होती.
एका ठिकाणचा गळका नळ दुरुस्त करायचा होता. कुठं फुटका पाईप बदलून नवीन बसवायचा होता. एका बंगल्यावर अशीच काही किरकोळ कामं करायची होती... तो घराबाहेर पडला अन् झपाझप चालू लागला.

Read More

गरज ?


नेहमीप्रमाणे हणमंतरावांना पहाटेच जाग आली. अन् नेहमीसारखंच त्यांना आजही उठावसं वाटेना. "करायचं काय ?"

नेहमी सारखाच त्यांना प्रश्न पडला. कशातच उत्साह वाटत नव्हता. अंगातला ताप निघून गेल्यावर जसं गळल्यासारखं होतं तसं वाटत होतं.

Read More

स्वरसम्राट


स्टेजवरील निळ्या पडद्यावर देवी शारदेचे वीणावादन करीत असलेले वित्र अन् त्यासमोरची शुभ्र भारतीय बैठक. पांढरे शुभ्र तक्ते. दोन तंबोलले आडवे ठेवलेले. तबला अन् डग्गा.
उदबत्त्यांचा सुवास स्टेजवर अन् समोरच्या झामियान्यात दरवळलेला. स्पीकरवरून मंद सुरात चाललेले सनईवादन. शामियान्यात हळूहळू जमा होऊ लागलेला विविधरंगी रसिक श्रोत्यांच्या संमिश्र कोलाहलात मिसळून तयार झालेले एक उत्कंठापूर्ण, तरल वातावरण.

Read More

चक्रांकित


ढगाळलेलं आकाश, आषाढातल्या झडीची अखंड रिपरिप. अर्धउजेडाची दुपार अन् ओलसर थंड वारा. कुंद वातावरण.

दुपारच्या झोपेतून परूळेकर जागे झाले अन् पुन्हा त्यांच्या मनाला त्या विचित्र अस्वस्थतेनं घेरलं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मनात एक विचित्र भावना, रितेपणाची, हरवल्यासारखं वाटणारी, उदासिनतामिश्रित अशी घर करून राहिली होती.

Read More

सूड !


"अत्यंत कोमल मनाची स्त्री सुद्धा, तिचा विश्वासघात झाल्यास किती क्रूर होऊ शकते अन् विश्वासघातक्याचा सूड उगविण्यासाठी वाटेल ते कृत्य करायला कशी मागेपुढे पाहात नाही याचा मला चांगलाच अनुभव माझ्याच जीवनात आलाय. तोच मी तुम्हाला सांगतो."
Read More

कन्फेशन !


मीना ! आता मध्यरात्रीचा सुमार आहे. टेबलावरच्या घड्याळात दीड वाजत आहे. वातावरणात नीरव शांतता भरलेली आहे. रातकिड्यांची किरकिर नि घड्याळाची टिक्टिक् ह्या शिवाय कसलाच आवाज ऐकू येत नाही, लक्षपूर्वक ऐकल्यास ऐकू येतो तुझा संथ श्वासोच्छवास.....

Read More

काटे घरचे काटे बाहेरचे !


डोक्यात आग नि डोळ्यात पाणी घेऊन जानकी, पुढचं दार घाडकन् मागं लोटून घराबाहेर पडते अन् रस्त्यावरून तरातरा चालू लागते - परत घरात पाय न ठेवण्याच्या निश्चयानं......
दारासमोर कोंडाळं करून आतलं भांडण चवीनं ऐकत उभे असणाऱ्या शेजाऱ्यांकडे तिचं लक्ष जात नाही, की आपल्यामागे घराचं दार फाडकन बंद झाल्याचंही तिला ऐकू येत नाही. या सुमारास संध्याकाळ ओसरून जाऊन रात्र चढू लागली असल्याचीही तिला जाणीव नसते. संतापानं फणफणलेली अशी ती चालतच राहते....

Read More

कुंती !


कुंती कोठेच्या वशीकरण प्रयोगातून मी शिताफीनं निसटलो असं त्यावेळी मला वाटलं होतं.... मी सुरू केलेल्या महान तपस्येचा भंग करावयास आलेली ती एक मायाविनी आहे असं मी समजलो होतो...
तिचा अनुभव मला माझी दिशाभूल करणाऱ्या चकव्यासारखा वाटला होता. माझ्या प्रगतीच्या मार्गात आडवी आलेली मखमली दलदल मी तिला समजलो होतो, जशी फसवी दलदल की, जिच्यावर पाय पडला असता तर मी पूर्णपणे गाडलो गेलो असतो, नामशेष झालो असतो.....

Read More

आधार !


संध्याकाळी साहित्यसंघात कवि चंडोलांच्या सत्कार सभेसाठी चिंतू जायला निघाला अन् चपला पायात घालत असताना त्याच्या कानावर अण्णाचं कुत्सित बोलणं पडलं.
'निघाली का स्वारी ? उकिरडे फुंकायला !'

Read More

धडा !


'आजकाल तुमचा स्वभाव खूपच चिडचिडा झालाय. रागही झटकन येतो.' सौ. नं चहाचा कप हातात देत नेहमीप्रमाणे शेरा मारला.
हे नेहमीचंच झालयं, सोक्षमोक्ष आज लावायचाच. म्हणालो. 'बस !' ती अनिच्छेने बसली. 'मला सांग, आजकाल म्हणजे ?'

Read More

सवत !


मनोहररावांनी आज पक्का निश्चय केला. ऑफिसला दिलेला स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मुदतीपूर्वीच वापस घ्यायचा. तीन महिन्यांपूर्वी दिलेला. कुणी काहीही म्हणोत. चेष्टा करोत. कारणंच तशी होती.
मनोहररावांनी आपला निर्णय परत एकवार तपासून पाहण्यास सुरुवात केली. आतापर्यंत कितव्यांदा ? कुणास ठाऊक...

Read More