स्थळ - दोन खोल्यांचा ब्लॉक, स्टेजवर बैठक कम बेडरुम, प्रेक्षकांच्या उजवीकडून बाहेरुन आंत येण्याचे दार, डावीकडे किचनमध्ये जाण्याचे दार, उमारच्या भिंतीत मध्यभागी एक खिडकी, खिडकीतून झाडाचा शेंडा दिसतो मजेच्या तारा दिसतात.. त्यावरुन हा ब्लॉक पहिल्या मजल्यावर आहे हे कळून बीवर तसंच खिडकीखालून वाहता रस्ता आहे हेहि कळून यावे. डाव्या मितीजवळ एक कॉट. त्यावर गांदी पसरलेली, चादर अस्ताव्यस्त, उजव्या बाजूला टेबल. त्यावर एक दोन पुस्तकेफिल्मफेअर वगैरे, पाणी पिण्याचा जग, टेबलाजवळ एक खुचर्ची. खिडकीजवळ एक खुर्ची, एक स्टूल (खुर्चीसमोर) सिनेमा नटीचे एक भडक कॅलेंडर. एका कोपऱ्यात आडवी दोरी. त्यावर कपडे टावेल वगैरे लोंबकळताहेत. वेळ :- शनिवार, सायंकाळचे सहा. पडदा उघडतो त्यावेळी वसंता टेबलाजवळच्या खुर्चीच्या पाठीला ताईत बांधून ठेवण्याच्या खटपटीत आहे. तोंडाने गाणं, "माझी होशील का... होशील का... होशील का.... ताईत बांधल्यावर खुर्चीवर बसून पाहतो. मग समाधान झाल्यासारखा चेहरा करतो, उठतो. कॉटवर बसतो. गुणगुणणं चालूच. उशी खालचा फोटो काढतो. डोळया समोर धरतो----). वशा: अकल्पिते। माझ्या हृदयाची स्वामीनी। मेरे जिगरके टुकडे। आता तू मला कुठवर हुलकावण्या देशील? आपल्या मादक नजरेच्या बाणानं माझ्या हृदयाचे हजारो तुकडे करुन त्यांना सुकुमार पावलांनी तुडवीत चालणाऱ्या फत्तर हृदये। आता तुला माझ्या पायाशी लोळण घ्यावीच लागेल. आजप्रर्यन्त माझ्या प्रेमाची दखल सुध्दा न घेणाऱ्या गर्दीष्ठ पोरी तुला आता माझ्यावर प्रीती करावीच लागेल. धावत येऊन माझ्या गळयाला मिठी मारावीच लागेल. पदर पसरावा लागेल. प्रेमाचौ भीक मागावी लागेल. हया वशाचं वशीकरणच तसं जबरदस्त आहे. बस्स।
comedy corner
वशाचं वशीकरण

Intense Theater
ब्रह्मर्षी सत्यकाम

(सत्यकामाचे घर- जुनाट. ओसरी, मध्यभागी माजघरातून ओसरीवर येण्याचे दार. दाराच्या दोन्ही बाजुला दोन खिडक्या, गज लावलेल्या. डावीकडे देवघर, उजवीकडे वर जाणारा जिना, ओसरीच्या खाली बरोबर दारासमोर पायरी. ओसरीच्या एक फूट खाली अंगण, अंगणात उजवीकडे तुळशी वृंदावन, डाव्या बाजुला एका खोलीत जाणारा दरवाजा. अंगणात रांगोळी, ओसरीवर सत्यकामाचे वडील येरझारा घालीत आहेत. हातवारे करीत स्वतःशीच पुटपुटत आहेत. तुळशी वृंदावनापाशी कट्ट्यावर सत्यकामाची मध्यमवयीन आई चिंतेत बसली आहे. ओसरीतल्या जिन्यावर सत्यकामाचा लहान भाऊ दत्तात्रय बसला आहे. भेदरलेला. वय वर्षे १५. एका खिडकीत सत्यकामाची पत्नी सावित्री दिसते आहे. ओढलेल्या चेहऱ्याची, कृश, डोळ्यांभोवती काळे, अशक्त, सासऱ्याच्या रागाने भेदरलेली, वय वर्षे १३, वडील धोतर, सदरा. दत्तू पायजामा, अंगरखा, स्त्रिया - नऊवारीत.)